
ओझे | Oze
नाशिक-दिंडोरी रस्त्यांवर काल एकच तासात ९ अपघात झाल्यानंतर आज पुन्हा रणतळे याच ठिकाणी वाहनाचा तिहेरी अपघात झाला असून त्यात दोन कंटेनर व मारुती व्हेन यांचा समावेश आहे. तर आज पहाटेच यांच ठिकाणी कंटेनरचा अपघात झाला आहे.
दरम्यान कालच्या अपघातांच्या घटनेनंतर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता भेट देणार होते, मात्र ते येणे अगोदरच या ठिकाणी आज पुन्हा अपघातांचे चित्र पाहायला मिळाले.
अपघातानंतर या रस्त्याच्या सुधारणे बाबत नागरिकांनी प्रश्न विचारण्यास सुरवात केली आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर रस्ता आणखी खराब होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.
सदर रस्त्याबाबत ना. झिरवाळ हे स्वतः दिंडोरी येथे संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्याशी चर्चा करणार असून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येणार आहेत.