त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मधील विश्वस्त पदाच्या मुलाखती २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. नाशिक येथील धर्मादाय आयुक्तालयात या मुलाखती पार पडणार आहेत.

दरम्यान त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या एका रिक्त जागेसाठी या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यावेळी धर्मदाय सह आयुक्त झपाटे हे या मुलाखती घेणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या एका जागेसाठी ३३ अर्ज दाखल झाले असून यामध्ये वकील, डॉक्टर, पती -पत्नी, विविध पक्ष पदाधिकारी, माजी विश्वस्त पदाधिकारी अशा मान्यवरांचे अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये चार महिलांचा समावेश आहे.