मुख्यमंत्री साहेब, प्रदूषण मुक्त गोदावरी कामांची पाहणी एकदा कराच

त्र्यंबकवासियांची आर्त हाक
मुख्यमंत्री साहेब, प्रदूषण मुक्त गोदावरी कामांची    पाहणी एकदा कराच

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwar

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CMEknath Shinde) हे ३० जुलैला नाशिक दौऱ्यावर (Nashik tour) येत असून या दौऱ्यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वरमधील (Trimbakeshwar) ३४ कोटीच्या प्रदूषण मुक्त गोदावरी (Godavari) कामांची पाहणी करावी अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे...

महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi government) काळात शिंदे हे नगरविकासमंत्री असताना त्र्यंबकेश्वर येथील विविध विकासकामासांठी ३४ कोटी रुपये मंजूर केले होते. येथील नगरपरिषदेत (Municipal Council) भाजपची सत्ता असतांनाही शिंदे यांनी प्रदूषण मुक्त गोदावरीसाठी (pollution free Godavari) या कामाला प्रोत्साहन दिले होते.

या कामासाठी जुलै महिन्यात पहिला दहा कोटींचा हप्ताही मंजूर झाला आहे. मात्र आता हे काम कधी चालू तर कधी बंद असे सुरु असून पाईप टाकण्यासाठी शहरातील चांगले रस्ते एका बाजूने खोदण्यात आले आहेत. तसेच हे काम पुणे (Pune) येथील एका यंत्रणेला देण्यात आले असले तरी हे काम स्वतः त्र्यंबक नगरपरिषद (Trimbak Municipal Council) करत आहे, त्यामुळे हे काम शास्त्रशुद्ध व्हावे अशी मागणी येथील स्थानिक करत आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्र्यंबकेश्वरला भेट दिली तर हे काम नेमके कशा पद्धतीने सुरु आहे हे सरकारला कळेल. याशिवाय पुढील कामासाठी निधी उपलब्ध होईल अशी आशा येथील स्थानिक बाळगून आहेत. तसेच त्र्यंबक नगरपालिकेत भाजपची सत्ता असल्याने शिंदे यांची भाजपशी युती आहे. त्यामुळे येथील काही भाजपचे नगरसेवक मुख्यमंत्री शिंदे यांची नाशिक दौऱ्यावेळी भेट घेण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com