नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात करोनाचा वाढता विळखा लक्षात घेता त्र्यंबकेश्वरला येत्या २९ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाकडून ४ एप्रिलपर्यंत मंदिरदेखील बंद ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती आज मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली...

दररोज प्रमाणे मंदिरात पूजा अर्चा होणार असून भाविकांना मात्र दर्शनासाठी पूर्णपणे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.

येथील प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार पोलीस अधिकारी तसेच तहसीलदार व व्यापारी यांच्यात एक बैठक काल पार पडली. या बैठकीत त्र्यंबकेश्वरमध्ये जनता कर्फ्यूबाबत निर्णय घेण्यात आला होता.

त्र्यंबकमध्ये सध्या ८६ रुग्ण करोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील करोनाचा एकदा बघता सावधानता म्हणून त्र्यंबकेश्वरमध्ये जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जनता कर्फ्यूदरम्यान मेडिकल व दूध विक्री वगळता इतर सर्व सुविधा बंद राहतील असे नियोजन करण्यात आले आहे.