
त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar
आठवडाभर बंद असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर आज सकाळी सात वाजता उघडले. हर हर महादेव, त्रंबकराज महाराज की जय, असा जय जयकार करीत महाद्वार शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत उघडण्यात आले...
त्र्यंबकेश्वर मंदिरातील उंबऱ्यावर माथा टेकवतांना गर्भगृहातील पिंडीचे देवांचे खुलले सौंदर्य पाहून भाविक अधिक श्रद्धाने नतमस्तक होत होते. त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहातील प्राचीन पिंडीची झीज थांबवून पिंडीचे संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व खात्याकडून वज्र लेप करण्यात आला.
25 लाखापेक्षा जास्त किंमत असलेले चांदीचे कलात्मक दरवाजे गर्भगृहाला बसवण्यात आले आहे. परिणामी गर्भगृहाचे सौंदर्य अधिक खुलेले आहे. प्रारंभी सकाळी मंदिरात श्री त्रंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष न्यायाधीश विकास कुलकर्णी यांच्या हस्ते पूजन झाले.
यावेळी ट्रस्टचे सचिव संजय जाधव, विश्वस्त प्रशांत गायधनी, भूषण अडसरे, ट्रस्टचे अधिकारी तसेच ठाणापती विष्णूगिरीजी ठानापती, धनंजय गिरीजी महाराज, चेतननाथ महाराज, उदासी संप्रदायाचे खंडेश्वरी महाराज, मंदिरात असणारे पुरोहित संघाचे सदस्य, मंदिराचे पुजारी तुंगार बंधू, तसेच विश्वस्त उपस्थित होते.