शहांच्या दौऱ्यासाठी त्र्यंबकनगरी सजली

शहांच्या दौऱ्यासाठी त्र्यंबकनगरी सजली

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwar

मंगळवारी असलेल्या योग दिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister) अमित शहा (Amit Shah) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे योग दिन (yoga day) साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरीत जिल्हा प्रशासनाने (District Administration) जोरदार तयारी केली आहे...

योग दिनाच्या कार्यक्रमात पावसाचा (Rain) व्यत्यय होऊ नये यासाठी भव्य मंडप टाकला गेला आहे. तसेच रस्त्यांची (Road) डागडुजी पूर्ण झाली असून साईड पट्ट्यांची दुरुस्ती देखील प्रगतीपथावर आहे.

या दौऱ्यामध्ये कसलीही कमतरता राहू नये यासाठी त्र्यंबक नगरपरिषद (Trimbak Municipal Council) त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट (Trimbakeshwar Devasthan Trust) ग्रामीण पोलीस, तहसील विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज मंडळासह आदी विभागाचे अधिकारी तळ ठोकून आहेत. तर गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील शासकीय निवास्थानाची (Government Residence) देखील स्वच्छता, रंगरंगोटी करण्यात आली आहे.

दरम्यान, योग दिनाच्या या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे ऑनलाईन उपस्थितीत राहणार असून ते येथे उपस्थित जनतेला संबोधित करणार आहेत. तसेच या दौऱ्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या (Shri Swami Samarth Gurupeeth) सद्गुरू मोरदादा चॅरिटेबल रुग्णालयाच्या (Sadguru Moredada Charitable Hospital) कोनशिलेचे अनावरण होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com