उद्या होणारा त्र्यंबकेश्वर रथोत्सव रद्द

उद्या होणारा त्र्यंबकेश्वर रथोत्सव रद्द

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

रविवारी (दि.२९) रोजी होणार्‍या रथोत्सवाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

कोविडचे वाढते रुग्ण व राज्यशासनाचे आताचे नियम पाहता परवानगी नाकारली असल्याचे वृत्त आहे.

रविवारी सुट्टीमुळे यात्रेकरूंची गर्दी होऊ शकते. मिरणूक परवानगी फेटाळली असा आदेश प्रांत अधिकारी तेजस चव्हाण यांनी काढला आहे. उत्सवाना प्रतिबंध आहे. मंदिरत गर्दी होऊ शकते. रथ मार्गात ही गर्दी राहील व सोशल डीस्टनस पाळले जाणार नाही या कारणाने परवानगी नाकारण्यात आली आहे. परवानगी फेटाळली, असे पत्र ट्रस्टला मिळाले आहे, असे विश्वस्त संतोष कदम यांनी सांगितले.

रविवारी त्र्यंबकेश्वराचा रथ न काढता पालखीतून त्र्यंबकेश्वर मुर्ती मिरवता येईल का किंवा मंदिर ठिकाणी जागेवरच रथ ठेवून पूजा होऊ शकते का या पर्यायावर विचार करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com