वाद्याच्या गजरात त्र्यंबकेश्वर रथ मिरवणूक

भाविकांचा ‘बम, बम भोले’चा जयघोष
वाद्याच्या गजरात त्र्यंबकेश्वर रथ मिरवणूक

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

रस्त्यांवर पुष्पांचा सडा, वाद्याचा गज आणि हजारो भाविकांनी बंब, बंब भोलेचा केलेला गजर.. अशा उत्सवी वातावरणात त्र्यंंबकेश्वराची मिरवणूक (Procession of Trimbakeshwar) रथातून काढण्यात आली. त्र्यंबकेश्वराच्या पंचमुखी मुखवट्याला कुशावर्त (Kushavarta) येथे स्नान घालण्यात आले.

रथोत्सवात पंचवीस हजारा भाविक उपस्थित होते. साडेचार वाजता पंचमुखी सुवर्ण मुखवटा रथात ठेवण्यात आला. त्यानंतर आरती झाली. त्रंबकराज की जय .. जयघोषात मिरवणूकीस (procession) प्रारंभ झाला. त्र्यंबकेश्वराचा रथ ओढण्यासाठी तीन मानाच्या बैलजोड्या जुंपण्यात आले होत्या. तर रथाचे सार्थ करण्यासाठी ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवण्यात आलेली होती.

भाविकांना हे दृष्य जणू काही साक्षात भगवान त्रंबकेश्वरचा सृष्टी करता ब्रह्मदेव रथ (Brahma Rath) ओढत आहे अशी आध्यात्मिक अनुभूती येत होती. मिरवणूक मार्गावर दूतर्फा भाविकांची रिघ होती. वाद्याच्या गजराने दुमदूमून गेला होता. सजवलेला रथ तीर्थराज कुशावर्तावर आला या ठिकाणी देवाला अभिषेक स्नान घालण्यात आले. रथ मिरवणुकीत खासदार हेमंत गोडसे,

यावेळी तृप्ती धारणे, भूषण आडसरे , सचिव संजय जाधव, पंकज भुतडा, प्रशांत गायधनी, दिलीप तुंगार , संतोष कदम ,सत्यप्रिय शुक्ल हे उपस्थित होते. आखाडा परिषदेचे शंकरानंद सरस्वती यांनी रथाचे चौकात स्वागत केले.विलास वाडेकर, जयंत शिखरे, पुजारी तुंगार मंडळी, सुनील अडसरे, अण्णा गाजरे, हे उपस्थित होते.

बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाकडून स्वागत . यावेळी सुरेश गंगापुत्र, किरण चौधरी, महेंद्र देवरे ,कुलकर्णी हे उपस्थित होते.सायंकाळी सातच्या सुमारास कुंडा वरून मंदिराकडे रथ परतण्यास प्रारंभ झाला होता.. त्रंबकेश्वर देवस्थान अध्यक्ष विकास कुलकर्णी यांनी मंदिरात हजेरी लावत. पूर्व दरवाजा परिसरात भेट देत रांगेच्या नियोजनाची पाहणी केली. ट्रस्टचे अधिकारी समीर वैद्य यांनी नियोजन केले.

महिलांकडून मंदिरात दीपप्रज्वलन

महिला सुहासिनींनी मंदिरात वाती लावण्यासाठी मोठी गर्दी केली होती.दिव्यांमुळे मंदिर परिसर उजाळून निघाला होता. दीपोत्सवासाठी देवस्थानकडून खास नियोजन करण्यात आले होते. भाविकांना पेढ्याचा वाटप करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com