त्र्यंबकमध्ये पथसंचलन; भाविकांच्या सुरक्षेसाठी 'अशा' पोलिसांची नियुक्ती

त्र्यंबकमध्ये पथसंचलन; भाविकांच्या सुरक्षेसाठी 'अशा' पोलिसांची नियुक्ती

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar

गौरी गणपती (Gauri Ganpati) व अन्य विविध सण उत्सव जवळ आल्याने त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Trimbakeshwar Police Station) आज शहरात पथसंचलन (Rout March) केले. त्र्यंबक पोलीस स्टेशन मधील पोलीस व दंगा नियंत्रण पथक पोलीस जवानांचा या पथसंचलनात सहभाग होता....

यावेळी पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे (Police Inspector Sandip Randive) यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने दाखल झालेले पोलीस उपनिरीक्षक चंद्रभान जाधव (PSI Chandrabhan Jadhav), पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे (PSI Ashwini Tile) यांच्यासह इतर पोलिसांचा या संचलनात समावेश होता.

दरम्यान, शिर्डी (Shirdi) येथे पोलीस खात्याकडून परराज्यातील यात्रेकरू भाविकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये बहुभाषिक मार्गदर्शनाचा देखील (Multilingual) एक भाग आहे. तसेच यासाठीची चौकशी खिडकी तयार करण्यात आली आहे.

यासाठी परराज्यातील यात्रेकरूनने जर अडचणीच्या वेळी पोलीसांची मदत मागितल्यास त्यांना तात्काळ मदत मिळेल. या केंद्रात विविध भाषांचे ज्ञान असलेले पोलीस कर्मचारी आहेत. त्यामुळे अडचण समजून घेऊन तत्काळ भाविकांना मदत पुरवली जाते आहे.

यंदा श्रावण महिन्यात जास्त मोठा पोलिस बंदोबस्त (Police Deployment) होता. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखणे . सद्याच्या काळातील नियम पाळणे यावर नियंत्रण राहिले परिणामी शांतता प्रस्थापित करण्यास पोलिसांना यश आले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com