
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
गेल्या दोन महिन्यात त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला (Trimbakeshwar Devasthan Trust) दोनशे रुपये पर व्यक्ती देणगी दर्शनातून जवळपास सहा कोटींचे उत्पन्न (Income) मिळाले आहे. तसेच वेगवेगळ्या देणग्यांमधून देखील देवस्थान ट्रस्टला उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान मालामाल होण्यास मदत झाली आहे...
अधिक श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला ५ कोटी ३ लाख ८० हजारांची कमाई झाली होती. या दोन महिन्यात सुमारे २५ लाख भाविकांनी (Devotees) त्र्यंबकेश्वरमध्ये भेट दिली असली तरी जवळपास निम्म्या भाविकांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) दर्शन घेतले. तर निम्म्या भाविकांनी इतर ठिकाणी देवदर्शन घेतले.
दरम्यान गेल्या दोन महिन्यात सुमारे दोन लाख भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा (Brahmagiri Pradakshina) केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर पुण्य संचय केला आहे. तर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला इतर देणग्यांव्यतिरिक्त अन्य पूजा आणि सुविधांमधून देखील उत्पन्न मिळते.