त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७३ गुन्हे

करोना नियमाचे उल्लंघन
त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७३ गुन्हे

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७३ जणांवर त्र्यंबक पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. अशी माहिती त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी दिली आहे.

दरम्यान त्र्यंबक शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकमध्ये स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात येत आहे. परंतु या दरम्यान विना मास्क, विना कारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलीस नजर ठेऊन आहेत. मागील काही दिवसात त्र्यंबक पोलिसांनी २७३ गुन्हे दाखल केले आहेत.

सध्या कोरोनाचा वाढत धोका पाहता कुणीही विनाकारण बाहेर पडू नये व गुन्हे दाखल करून घेऊ नये, स्वतःच्या गावाला व घराला रोग मुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे भावनिक आवाहन रणदिवे यांनी केले आहे.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी भीमाशंकर ढोले, एपीआय पांढरे तसेच गोपनीय पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com