Photo : मुसळधार पावसानंतर त्र्यंबकमध्ये चिखलाचे साम्राज्य; पाहा फोटो

Photo : मुसळधार पावसानंतर त्र्यंबकमध्ये चिखलाचे साम्राज्य; पाहा फोटो

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

त्र्यंबक शहरात (Trimbak City) काल दिवसभर तसेच रात्रभर झालेली पावसाने (Heavy Rainfall) परिसर जलमय झाला होता. अनेक घरांत पाणी, तर अनेक ठिकाणी चिखल झाला होता.

दरम्यान काल दिवसभरात त्र्यंबकेश्वर शहर परिसरात २१६ मिलिमीटर (Heavy Rain) पावसाची नोंद झाली. यामुळें परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले.

सलग दोन दिवस पाऊस सुरू असल्याने ब्राम्हगिरी पर्वतावर (Bramhgiri Mountain) धबधबे वाहू लागले. त्यामुळे परिसरातील सर्व पाणी शहरात घुसले. त्यामुळे रात्रीच्या सुमारास शहरात पाणीच पाणी झाले. यामुळे बाजारपेठही बंद (Market Closed) ठेवण्यात आल्या होत्या.

तर रात्री उशिराच्या पावसाने मेनरोड (Main road), तेली गल्ली, बोहर पट्टी, गंगासागर तलाव, कुशावर्त चौक (Kushawart), कदम चौक, भगवती चौक, गोकुळदास लेन या भागात पाणी पाणी साचले होते. थोडक्यात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. काही घरांमध्ये, बंद दुकानामध्ये पाणी शिरले तर तर काहीच्या उंबऱ्यापर्यंत पाणी लागले.

सकाळच्या सुमारास पावसाने उघडीप दिली. त्यावेळी शहरात गाळच गाळ पसरला होता. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी साफसफाई सुरू केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com