अनोख्या पद्धतीने गाडगे महाराजांना अभिवादन

अनोख्या पद्धतीने गाडगे महाराजांना अभिवादन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अज्ञान, अंधश्रद्धा,अस्वच्छता यांचे उचाट्टन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे थोर संत गाडगे महाराज (Sant Gadge Maharaj) यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गंगापूर रोड (Gangapur Road) येथे स्वच्छता सेवकांनी स्वच्छता सप्ताह राबवित अनोख्या पद्धतीने गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले...

विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, स्वच्छता निरीक्षक दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मुकादम इक्बाल मनियार आणि सहायक स्वच्छता मुकादम सनी जाधव यांच्या पुढाकाराने गंगापूर रोड परिसरात अनोख्या पद्धतीने स्वच्छता सप्ताह राबविण्यात येणार आहे. उदोजी मराठा कॅम्पस (उदोजी रोड) येथे साप्ताहिक स्वच्छता मोहिमेची (Cleaning Campaign) सुरुवात करण्यात आली.

पुढील सात दिवस शांतिनिकेतन, अयाचितनगर, चैतन्य नगर, खाऊ गल्ली रोड, स्व.वसंत पवार चौक, मॉडेल कॉलनी येथे स्वच्छता मोहीम होणार असून यावेळी नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्व आणि गाडगे महाराज यांचे विचार रुजविण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता मुकादम इकबाल मणियार (Iqbal Maniyar) यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com