वेळुंजे । Velunje

कोकण मराठी साहित्य परिषद व जव्हार येथील राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने (दि.२५) वारली चित्रकलेचे पूजक पद्मश्री कै. जीवा सोमा म्हसे यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले.

या वेळी या कार्यक्रमास प्रगतिगतशील लेखक संघाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष संजय दोबाडे, अ.भा.ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष देवचंद महाले आदींसह नवोदित कवी, कवियत्री उपस्थित होत्या.

वारली चित्रकलेचे प्रसारक पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांच्या जन्मदिवसानिमित्त कलासाहित्य आणि आपण हा चर्चात्मक कार्यक्रम पार पाडला. यावेळी कार्यक्रमात अशिक्षित असलेले उत्कृष्ठ तारपावादक धिकल्या धुंडा उपस्थित होते. ते स्वतः तारपा गेल्या साठ वर्षांपासून हे वाद्य तयार करतात. यासाठी त्यांच्या या तारपा वाद्याला बाहेरील राज्यातूनही मागणी आहे.

याच ठिकाणी वारली चित्रकला पेंटिंगचे दालन असून तेथे अनेक प्रकारची चित्रे व हस्तकला सांभाळून ठेवल्या आहेत. आजही या ठिकाणी जिव्या सोमा म्हसे यांच्या वारली चित्रकलेचा सुंगध दरवळतो आहे.