
नाशिक । प्रतिनिधी Nashik
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर ( Bharat Ratna Dr. Babasaheb Aambedkar )यांच्या 131व्या जयंतीसाठी शहर सज्ज झाले आहे. सर्वत्र निळे झेंडे, पताका फडकू लागल्या असून चौकाचौकात महामानवाला मानवंदना देण्यासाठी कार्यक्रमांचेे आयोेजन करण्यात आले आहे.
बुधवारी मध्यरात्री नाशिक व नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन जयंती उत्सवाला सुरुवात झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजीरोडवरील पूर्णाकृती पुतळ्यास पालकमंत्री छगन भुजबळ, डॉ. शोभा बच्छाव, समीर भुजबळ, रंजन ठाकरे आदींनी अभिवादन केले.