भारतीय चित्रपट सृष्टीतील महानायक हरपला !

भारतीय चित्रपट सृष्टीतील महानायक हरपला !

नाशिक | Nashik

भारतीय चित्रपट सृष्टीतील (Indian Cinema) ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Actor Dilip Kumar) यांच्या निधनामुळे (Passes Away( तीव्र दु:ख झाले असून त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीतील महानायक हरपला असल्याच्या शोकभावना पालकमंत्री छगन भुजबळ (Minister Chhaan Bhujbal) यांनी व्यक्त केल्या आहे.

छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, दिलीप कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. त्यांच्याशिवाय चित्रपट सृष्टीतील इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. ट्रॅजेडी किंग' (Trajedi King) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमारांनी सुमारे सहा दशकं त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं.

आपल्या कामामुळे अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी नवे आयाम प्रस्थापित केले. सर्वाधिक पुरस्कार जिंकण्यासाठी दिलीप कुमार यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. दिलीप कुमार पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीची अपरिमित अशी हानी झाली असून एक कलागुण संपन्न अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी प्रार्थना करतो असे भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com