मागण्यांसाठी आदिवासींचा महसूल कार्यालयावर मोर्चा

मोर्चेकरांची जिल्हाधिकारी, उपायुक्तांशी चर्चा
मागण्यांसाठी आदिवासींचा महसूल कार्यालयावर मोर्चा

नाशिकरोड । प्रतिनिधी | Nashik Road

तब्बल दोन वर्षांनी करोनाचे (corona) निर्बंध संपल्यानंतर प्रथमच नाशिकरोडकरांना आदिवासींचे शक्ती प्रदर्शन (Demonstration of tribal community's power) बघावयास मिळाले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (Marxist Communist Party) व नाशिक जिल्हा किसान सभेच्या (Nashik District Kisan Sabha) वतीने येथील महसूल आयुक्त कार्यालयावर (Office of the Commissioner of Revenue) विविध मागण्यांसाठी आदिवासींच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण जिल्ह्यातून या मोर्चामध्ये आदिवासी बांधव (tribal community) सहभागी झाले होते.

तत्पूर्वी महसूल आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन (agitation) करण्यात आले. त्यानंतर माजी आमदार जीवा पांडू गावित (Former MLA Jiva Pandu Gavit) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डी. गंगाथरण (Collector Gangatharan d. ) व महसूल उपायुक्त गोरक्ष खाडिलकर (Deputy Commissioner of Revenue Goraksh Khadilkar) यांच्यासोबत विविध मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मोर्चेकरांना नेत्यांनी चर्चेचा तपशील सांगितला.

यावेळी माजी आमदार जिवा पांडू गावित, डॉ.डी. एल कराड, अशोक ढवळे, किसन गुजर, इरफान शेख, सुनील मालुसरे, भिका राठोड, सावळीराम पवार, रमेश चौधरी, डॉ. देवराम गायकवाड, हनुमान गुंजाळ, अप्पा भोळे, सुवर्णा गांगुर्डे, वसंत बागुल, संजूबाई खंबाईत आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून धरणे धरण्यात आले. वन अधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून सर्व अपात्र दावे पात्र करा, वन अधिकार कायद्यानुसार पात्र दावेदारांच्या कब्जे वहिवाटीस असलेली 4 हेक्टरपर्यंत जमीन मोजून त्याचा सातबारा करण्यात यावा,

पात्र दावेदारांचे नाव सातबाराला कब्जेदार सदरी लावा व ती जमीन वहिवाटीस योग्य आहे असा शेरा मारावा, जुने अपूर्ण तलाव व लघु पाट बंधार्‍याच्या योजना पूर्ण कराव्या, नार पार दमण गंगा, ताण मान अंबिका नद्यांवर व त्यांना मिळणार्‍या छोट्या नद्यांवर मोठ्या क्षमतेचे पाणी साठा असलेले सिमेंट बंधारे (Cement dams) त्वरित बांधावे, नाशिक जिल्ह्यातील (nashik district) कांद्याला लागवडीच्या खर्चाच्या दीडपट भाव द्यावा, गरजू कुटुंबाना प्रधानमंत्री आवास घरकुल योजना तात्काळ मंजूर करून घराची किंमत 3 लाख करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या दरम्यान यावेळी महत्वच्या नेत्यांची भाषणे झाली.

महसूल आयुक्त कार्यालयावर आदिवासी बांधवांचा (tribal community) मोर्चा येणार असल्याने संपूर्ण नाशिकरोड परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मोर्चाच्या बंदोबस्तासाठी गेल्या दोन दिवसांपासून नाशिकरोड पोलीस ठाण्यात नियोजन करण्यात येत होते. त्यासाठी महसुल आयुक्त कार्यालय परिसरात ठिकठिकाणी बॅरिकेडस् लावण्यात आले होते. मोर्चेकरांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहा. पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ हे ठाण मांडून बसले होते.

तसेच बंदोबस्ताबाबत वपोनि अनिल शिंदे,पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, राजू पाचोरकर, वाहतूक शाखेचे धनराज पाटील यांना व त्यांच्या सहकार्‍यांन सूचना करत होते. मोर्चासाठी सकाळी 11 वाजेपासूनच आदिवासी बांधव चारचाकी वाहनद्वारे आयुक्त कार्यालयाकडे येत होते. बिटको चौक ते द्वारका दरम्यान संपुर्ण रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतुक विस्कळीत झाली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com