‘आदिहाट’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या कलाकुसरीला मिळाली बाजारपेठ

‘आदिहाट’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या कलाकुसरीला मिळाली बाजारपेठ

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

आदिवासी समूहाच्या (tribal community) कलाकुसरीला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने आदिवासी विभागाकडून एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यांच्या कलांचे कायमस्वरूपी जतन व संवर्धन करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचीत्त्य साधत ‘आदिहाट’ (aadihat) हा उपक्रम सुरु करण्यात आला.

विविध प्रदर्शने, महोत्सवांमध्ये आदिवासी संस्कृतीशी निगडित वस्तू, खाद्यपदार्थ, धान्य,  मसाले आणि सजावट अशा विविध साहित्याची दालने लावण्यात येतात. मात्र, ती ठराविक कालावधी पुरतीच मर्यादित राहतात. यानंतर या वस्तूंचा बाजार बंद होतो. ही बाब आदिवासी विकास विभागाने लक्षात घेऊन कायमस्वरूपी बाजारपेठ आणि रोजगारासाठी आदिहाट हा उपक्रम सुरू करण्यात आला असून तो वर्षभर असाच सुरु ठेवण्यात येणार असल्याचे विभागाने सांगितले.

या उपक्रमाचे उद्घाटन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे आणि आदिवासी विकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.

याअंतर्गत आदिवासी आयुक्तालयात मुंढेगाव आणि वाघेरा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, तसेच त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी बांधवानी बनवलेल्या वस्तू आणि औषध विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

आदिवासी विकास आयुक्तालय, ठक्कर बाजार याबरोबरच महामार्ग बस स्थानक आणि रेल्वेस्टेशन येथेही हा आदिहाट भरविण्यात आला असून त्यामध्ये पारंपरिक धान्य देखील उपलब्ध आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com