आदिवासी महिलांचे लसीकरणाबाबत काम कौतुकास्पद - डॉ नीलम गोऱ्हे

आदिवासी महिलांचे लसीकरणाबाबत काम कौतुकास्पद - डॉ नीलम गोऱ्हे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

करोना काळात नागरिकांचे जीवन सुसह्य करणाऱ्या अनेक योजना शासनामार्फत राबविण्यात आल्या आहेत. अशा योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात. तसेच नाशिक जिल्हा परिषदेने (nashik zilla parishad) आदिवासी भागात व महिलांच्या लसीकरणाबाबत (Woman Vaccination in tribal area) करण्यात आलेले काम कौतुकास्पद असून त्याची राज्यस्तरावर अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले...(Tribal woman good work for vaccination in nashik district Dr Neelam Gorhe)

डॉ. गोऱ्हे यांनी आज नाशिक, धुळे, जळगांव, पुणे, पालघर व जालना या जिल्ह्यांनी करोना काळात केलेल्या विविध कामांचा दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी नाशिक जिल्ह्यातुन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हाधिकारी यांच्या प्रतिनिधी उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतरे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणल्या, कोविड सेंटर्समध्ये (Covid Center) महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिने गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यांची सर्वच जिल्ह्यातील पोलिस विभागाने चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केलेली आहे.

तसेच कोविड काळात सर्व सामान्य नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करून योग्य काळजी घेण्यासाठी करण्यात आलेली दंडात्मक कार्यवाही योग्यच आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्याने विधवा झालेल्या महिलांना त्यांच्याशी संबंधित शासनाच्या विविध योजनांचा लाभ व्हावा व कायद्यांची माहिती देण्यासाठी तालुकास्तरावर ऑनलाईन पद्धतीने बैठकांचे नियोजन करण्यात यावे.

महिलांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महिला दक्षता समितीच्या नियमित बैठका घेण्यात याव्यात. तसेच या काळात ज्या मुलींचे अपहरण झाले आहे अथवा ज्या घरी परत आल्या आहेत अशा महिला व मुलींशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी दिल्या आहेत.

करोनाच्या काळात शासनाने केलेल्या कामांची माहिती देणारी 'दोन वर्ष जनसेवेची' ही पुस्तिका माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेली आहे. ही पुस्तिका जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात यावी, जेणे करून लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यामार्फत शासनाने केलेल्या नागरिकांच्या हिताची कामे सर्वसामान्यांनापर्यंत पोहचून त्यांची माहिती नागरिकांना मिळेल.

महसुल (Revenue), पोलिस (Police), कृषी (Agriculture), महिला व बाल विकास (Woman and child development), कामगार (Workers) अशा विविध विभागांनी कोरोना कालावधीत केलेल्या नाविन्यपूर्ण कामांचा डेटाबेस तयार करून त्याबाबत सविस्तर अहवाल येत्या पंधरा दिवसांत सादर करण्यात यावा. या सादरीकरणाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी इतर जिल्ह्यांत राबविण्यास मदत होईल, असेही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

महिला बचत गटांच्या (Mahila bachat gat) मदतीने आदिवासी भागात लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचे महत्वाचे काम करण्यात आले आहे. तसेच एक मुठ पोषण अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (ZP nashik ceo leena bansod) यांनी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांना सादर केली.

त्याचप्रमाणे कोरोना काळात दोन्ही पालकांच्या निधनामुळे अनाथ झालेल्या बालकांना व पतीच्या निधनामुळे एकल व विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी 'मिशन वात्सल्य' ही योजना राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर कोरोना काळात करण्यात आलेल्या कार्यावाहीची सविस्तर माहिती उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती यांना दूरदृष्यप्रणालीद्वारे सादर केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com