आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आता 'टॅब' मिळणार

के.सी.पाडवी : 'अनलॉक लर्निंग' उपक्रम
आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आता 'टॅब' मिळणार

नाशिक । Nashik

आदिवासी विभागाच्या शिक्षण धोरणांमध्ये अमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. करोनामुळे शाळा बंद आहे. आदिवासी विभागाच्या सचिवांनी 'अनलाॅक लर्निंग' हा उपक्रम सुरु केला आहे. त्यानूसार इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टॅब दिला जाणार आहे. तसेच वर्क होम नूसार इयत्ता पहिली ते आठविच्या विद्यार्थ्यांना शिक्षक त्यांच्या गावी जाउन शिक्षणाचे धडे देतील अशी माहिती आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी दिली.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिकला आले असता रविवारी (दि.९) त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. आदिवासी विभाग शिक्षणक्रम बदलावर भर देत आहे. आगामी काळात निश्चितच त्यात बदल दिसतील. अनलाॅक उपक्रमाअंतर्गत शिक्षक गावात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवतील. दुर्गम वस्ती व पाडयावर पोहचणे शक्य नसल्यास तेथील शिकलेल्या युवक युवतींची मदत घेऊन विद्यार्थ्यांना शिकवले जाईल. त्यासाठी त्यांना मानधन दिले जाईल.

शहरी भागाच्या तुलनेत आदिवासी भागात करोनाचा शिरकाव कमी आहे. तो वाढणारच नाही या भ्रमात राहता येणार नाही. आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्याची ने आणमुळे त्यांना करोना संसर्ग धोका होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातच शिक्षण देण्यावर भर आहे. आदिवासी बहुल गावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य कक्ष स्थापन केला जाईल. नंदूरबारमध्ये आदिवासिंनी लाॅकडाऊनचा धसका घेतला.

शिवाय मुंबई, पुणे, नाशिक या शहरी भागातील नागरिकांच्या येण्यामुळे नंदूरबारमध्ये करोनाची बाधा झाली. या ठिकाणी आता करोना टेस्टिंग लॅब उभारण्यात आली आहे. त्यामुळे निदान होऊन त्वरीत उपचार केले जात आहे.

भगरचा पोषण आहारात समावेश

कमी वयात लग्न, संततीमध्ये गॅप न ठेवणे अशा अनेक गोष्टींमुळे आदिवासी महिला व बालकांचे आरोग्य ही गंभीर समस्या बनली आहे. भगर हे पौष्टिक अन्न आहे. तसेच कर्नाटक व तेलंगाणात मोहाची फुले दिली जातात. या दोन्हिचा गरोदर माता व बालकांना आहार म्हणून दिले जाईल, अशी माहिती पाडवी यांनी दिली.

Related Stories

No stories found.