आदिवासी संशोधक अभिछात्रवृत्ती : बोगस आदिवासींची घुसखोरी

आदिवासी संशोधक अभिछात्रवृत्ती :  बोगस आदिवासींची घुसखोरी
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आदिवासींच्या Tribales जागेवर नोकरीवर लागलेल्या बोगस आदिवासींचा प्रश्न अद्याप प्रलंबित असताना आता आदिवासी संशोधक अभिछात्रवृत्तीतही Tribal Researcher Scholarship बोगस आदिवासींची घुसखोरी सुरू झाली आहे Infiltration of Duplicates tribals .

नाशिक, धुळे, औरंंगाबाद व मराठवाड्यात या बोगस आदिवासींचे पेव फुटले असून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर त्यांनी आता त्याबाबत चौकशी सुरू केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बोगस अभिछात्रवृती धारकांचे पितळ लवकरच उघडेे पडण्याची शक्यता आहे.

आदिवासी संशोधक अभिछात्रवृतीमध्ये पीएचडी, फेलोशीप ट्रायबल रिसर्च फेलोशीपसाठी विविध विद्यापीठांत प्रवेश दिला जातो. जेणे करुन आदिवासी तरुणानी चांगले संशोधन करावे, असा हेतु त्यामागे आहे. मात्र गेल्या काही वर्षात त्यातही नाम साधर्म्याचा फायदा घेवून बोगस आदिवासी विविध विद्यापीठात प्रवेश घेत आहेत. त्यामुळे जातपडताळणी प्रमाणपत्र प्रत्येक विद्यापीठ व संशोधन केंद्र येथे अनिवार्य करावे, अशी मागणी डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे प्रा. मोहनसिंग पाडवी, प्रा. बबलू गायकवाड , प्रा. डॉ. सुनील केदारी, प्रा. राजू भोकटे, अनिश तडवी यांनी केली होती. त्यानंतर डॉ. भारुड यांंनी शोध घेेण्याचे आदेश दिले आहेत.

‘बोगस आदिवासी’ गंभीर समस्या

‘बोगस आदिवासी’ म्हणजे आदिवासी जातींच्या नावाशी असणार्‍या नामसाधर्म्याचा फायदा घेऊन खोट्या कागदपत्रांद्वारे व प्रशासनातील काही भ्रष्ट यंत्रणेचा फायदा घेऊन जातप्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी व शिक्षण यात आदिवासी नसतानाही आदिवासींसाठी असलेल्या सवलती मिळविणारे, अनुसूचित जमातींसाठी 7 टक्के आरक्षण आहे. त्या 7 टक्के आरक्षणाचा फायदा मिळू शकणारे आदिवासी बांधव साधेभोळे, लाजरे बुजरे आणि नागरी वस्तापासून थोडे दूरच राहणारे आहेत. त्यांना या आरक्षणाचा म्हणावा तसा फायदा होत नाही. त्यामुळे या 7 टक्के आरक्षणाचा लाभ घ्यायला उच्चभ्रु वर्गातील काही लोक जात बदलून घेत आहेत. शैक्षणिक-आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीने चांगले असलेले लोक आदिवासी म्हणून जात प्रमाणपत्र काढू लागले. त्यातूनच ‘बोगस आदिवासी’ तयार झाले आहेत.

आदिवासीचे खोटे सर्टिफिकेट मिळवत डॉक्टर, इंजिनिअरिंग तसेच तत्सम उच्च प्रशिक्षणात सवलती मिळवत आहे. प्रवेश सुकर व्हावा म्हणून ही खोटी सर्टिफिकेट्स बनवतात. त्याचा फटका खर्‍या आदिवासींना आता बसत आहे. पूर्वी संशोधनात आदिवासी कमी होते. त्यामुळे ही समस्या फारशी जाणवली नाही. आता मात्र तरुण पुढे येऊ लागल्यानंतर त्यांंना ही अडचण े प्रकर्षाने जाणवू लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com