आदिवासी फर्निचर घोटाळा: 'या' तारखेला होणार पुढील सुनावणी

आदिवासी फर्निचर घोटाळा: 'या' तारखेला होणार पुढील सुनावणी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

आदिवासी विकास विभाग (Department of Tribal Development) अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमध्ये फर्निचर (Furniture) खरेदीसाठी केवळ ११२ कोटी रुपयेचा मंजूर असतांना त्याहून अधिक म्हणजेच ३२५ कोटींचे फर्निचर खरेदी करून घोटाळा झालेला आहे.

या घोटाळ्यात तक्रारदारांनी उच्च न्यायालयात (High Court) दाखल केलेल्या अवमान याचिकेवर उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने १४ नोव्हेंबर रोजी पुन्हा सुनावणी ठेवली आहे. सुनावणीदरम्यान चौकशी अहवाल सादर करण्यासाठी विभागाने एका महिन्याची मुदत मागितली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वित्तीय व प्रशासकीय मान्यता (Financial and administrative approval) नसतांनाही खरेदी करण्यात आली होती. राज्याच्या लेखा संचालनालयाने (Directorate of Accounts) या खरेदी प्रक्रियेवर आक्षेप घेत, ठेकेदारांना (contractors) बिले (bils) देण्यास नकार दिला होता. त्यामुळे या खरेदीला स्थगिती होती. तरीही ही खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामुळे तक्रारदारांनी अखेर उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने या खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे मान्य करत, विभागाला चौकशी करून संबधितांवर कारवाईचे आदेश दिले होते.

यासाठी आदिवासी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील गठित करण्यात आलेली आहे. मात्र,समितीकडून अहवाल सादर न झाल्याने तक्रारदाराने या प्रकरणी अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर मागील आठवड्यात मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता (Chief Justice Dipankar Dutta) यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. यात चौकशी अहवाल अंतिम सात असल्याचे सांगत तो सादर आणखी अवधी देखील मागितला आहे. या प्रकरणी न्यायालयात पुन्हा १४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com