कळवण
कळवण
नाशिक

आदिवासी बांधव घरकुलांपासून वंचित

प्रशासनाने दखल घेण्याची मागणी

Gokul Pawar

Gokul Pawar

मोहबारी । Mohbari

कळवण तालुक्यातील मोहबारी परिसरातील भागातील काही गावातील आदिवासी बांधव शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहिले आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील अनेक गावात नागरिक अद्यापही घरकुलापासून वंचित आहेत.

आजही या भागातील अनेक नागरिकांच्या जुनी घरे असून घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत. येथील घरे कौलारू, चिनी मातीची, पांढऱ्या मातीने गिलावे दिलेली, प्लॅस्टिकच्या व ताडपत्रीच्या सहाय्याने झाकलेल्या तसेच पडक्या भिंती, कारविने कुड भरून शेणाने सारवलेले अशी घरांची अवस्था झालेली पाहायला मिळत आहे. अद्याप मोहबारी परिसरातील काही आदिवासी बांधवांना प्रधानंमत्री आवास योजना घरकुल व इंदिरा गांधी घरकुल योजना, शबरी माता आवास योजनांचा लाभ मिळालेला नाही.

अशा ग्रामीण भागातील व्यक्तींना ग्रामपंचायतीला जास्त घराची आकडेवारी द्यावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. देखील यावर्षी जास्त पावसाच्या अभावी किवा चक्रीवादळामुळे अशा घरांची पडझड होऊ शकते. देखील आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने त्वरीत दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील आदिवासी महिला व ग्रामस्थांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com