जिल्ह्यातील आदिवासी भाग निसर्ग सौंर्द्याने बहरला!

जिल्ह्यातील आदिवासी भाग निसर्ग सौंर्द्याने बहरला!

दिंडोरी । Dindori

सुरगाणा(Surgana), पेठ (Peth), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), इगतपूरी (Igatpuri) तालुक्यातील सर्वच परिसराला निसर्गाने भरभरुन सौंदर्य प्रदान केले आहे. त्यातच सुरगाणा तालुक्यातील खोकरविहीर (Khokarvihir) परिसरातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना (Tourist) आकर्षित करत आहे.

खोकरविहीर परिसरात मन मोहून टाकणारे निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात पाहायला मिळते. नद्या, नाले, झरे, डोगर माथ्यावरील हिरवळ पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे, या परिसराला निसर्गाने अनमोल ठेवा दिला आहे. आकर्षक डोगरमाथा, त्यातून वाहणार्‍या पांढर्‍या शुभ्र झर्‍याचे पाणी, सुंदर अशी झाडे, वेली, हिरवळीचे गालिचे पाहून डोळ्याचे पारणे फिटत आहे.

खोकरविहीर गांव शिवराला लागून असलेला तालुक्यातील सुप्रसिद्ध असा भिवतास धबधबा (Bhivtas Waterfall) तर तालुक्याचे मुख्य आकर्षण केंद्र बनले आहे. त्याच्याच खाली, बेलीचा पाबोर झरी, परेटी डोह, हंडा-हंडी डोह अतिशय सुंदर दिसत आहे. गावा जवळील डोगरातून वाहणारी चिपची झरीतुन वाहणारे पांढरे शुभ्र पाणी तर मन मोहून टाकत आहे. अशा प्रकारच्या विविध निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर पर्यटकांना आकर्षित करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com