नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्हयात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे आचारसहिंता लागू आहे. त्यामुळे शासकीय कामे व नियोजनास एकीकडे अडथळा असताना दुसरीकडे मात्र आचारसहिंतेतच राज्याची आदिवासी क्षेत्र आढावा समिती जिल्हा दौऱ्यावर आहे.

शासकीय कामांना आचारसहिंता असताना समितीला आचारसहिंता नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत मंगळवार (दि.१२) व बुधवारी (१३) जिल्हा दौऱ्यावर आहे.

मंगळवारी सुरगाणा येथील शासकीय विश्रामगृहावर सकाळी ११ वाजता तर बुधवारी सकाळी ११ वाजता दिंडोरी शासकीय विश्रामगृहावर पंडीत आढावा बैठक घेणार आहे. खावटी योजना, स्वस्त धान्य पुरवठा, वनहक्क अंमलबजावणी, शिक्षण, आरोग्य रोजगार हमी कायदा, आदिवासी दुर्गम भागातील रस्ते , वीज, पाणी पुरवठा, जमीन भाडे करार प्रकरणे, विस्थापन, प्रकल्प बांधितांचे पुनर्वसन आदींचा यात आढावा होणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या उपस्थितीत सटाणा तालुक्यातील देवमामलेदार स्मारक येथे कार्यक्रम होणार होता. परंतू, जिल्हयात ग्रामपंचायतीं निवडणुकांची आचारसहिंता असल्याचे कारण देत राज्यपाल कोशारी यांचा दौरा स्थगित करण्यात आला होता.

दिंडोरी तालुक्यातील ६० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून येथे बैठक होत आहे. त्यामुळे हा आचारसहिंतेचा भंग नाही का ? अशा चर्चेला यामुळे उधाण आले आहे.