तहसीलदारांची मध्यस्थी; आमरण उपोषणाची सांगता

तहसीलदारांची मध्यस्थी; आमरण उपोषणाची सांगता

जानोरी | Janori

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) जानोरी (Janori) येथील आदिवासी (Tribals) बांधवांच्या आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी शक्ती सेनेच्या (Adivasi Shakti Sena) वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाची (Agitation) आज दुसऱ्या दिवशी दिंडोरी तहसीलदार पंकज पवार (Dindori Tehsildar Pankaj Pawar) यांच्या मध्यस्थीने सांगता करण्यात आली...

जानोरी येथील गट क्रमांक 1124 मधील हद्दीबाबत असलेल्या तक्रारीची दखल घेत नसल्याचे निषेधार्थ आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने कालपासून आंदोलन सुरू करण्यात आले होते.

दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार व गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार (Chandrakant Bhavsar) यांनी आज उपोषणकर्त्यांची भेट घेत नंबर ११२४/१ व २ वादग्रस्त गटाची पाहणी केली.

तहसीलदारांची मध्यस्थी; आमरण उपोषणाची सांगता
आदिवासी बांधवांचे आमरण उपोषण

जोपर्यंत या गटाची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत तेथे सुरू असलेल्या कंपाऊंडच्या कामाला स्थगिती द्यावी तसेच संबंधिताला याबाबत तत्काळ नोटीस द्यावी, गरज पडल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जानोरी ग्रामपंचायतचे प्रशासक अण्णा गोपाळ व ग्राम विकास अधिकारी के. के. पवार यांना देण्यात आले.

उपोषणकर्त्यांना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल व कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाल्यानंतर आवश्यक तो कायदेशीर निर्णय घेण्यात येईल, तसेच चर्चेचे इतिवृत्त तयार करून त्या माहितीची प्रत उपोषणकर्त्यांना देण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार पंकज पवार यांनी दिले.

यावेळी तलाठी किरण भोये, दत्तात्रय कोरडे, सोमनाथ वतार, रविंद्र बदादे, देवराम मोकाशी, ज्ञानेश्वर केंग, शंकर बेंडकुळे, गोरख जाधव, चंद्रकांत कडाळे, माधव मोरे, अंबादास फसाळे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.