मनपाच्या बसेसचा ट्रायल रन पूर्ण

अडीच हजार प्रवाशांनी घेतला मोफत सेवेचा लाभ
मनपाच्या बसेसचा ट्रायल रन पूर्ण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आठ जुलै रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते शुभारंभ होणार्‍या नाशिक महापालिकेच्या बससेवेचा ट्रायल रन (Trial run of Nashik Municipal Corporation bus service) जवळपास पूर्ण झाला आहे...

प्रशासनाच्यावतीने काही मार्गांवर प्रवाशांना देखील बसून तांत्रिक गोष्टी तपासण्यात आल्या. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार सुमारे अडीच हजार नाशिककरांनी नवीन बसमध्ये मोफत प्रवासाचा (Free travel) आनंद घेतला.

नाशिक महापालिकेच्या उत्पन्नात आणखी भर पडावी यासाठी नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) बस सेवा सुरू करीत आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिक महापालिकेच्या बससेवेला अखेर मुहूर्त सापडला आहे.

पहिल्या टप्प्यात सुमारे 50 बसेस शहराच्या विविध मार्गांवर धावणार आहे. तर नाशिककरांना नव्याकोर्‍या बसचा आनंद मिळणार आहे. यासाठी नाशिककर या नवीन बसची वाट बघत आहे. नाशिक ते नाशिकरोड, पंचवटी आदी रस्त्यांवर बसेस धावणार असून ट्रायल रन देखील पूर्ण झाला आहे.

दोन दिवसांत सुमारे अडीच हजार नाशिककरांनी मोफत प्रवास केल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकरोड बसस्थानकातून सर्वाधिक 800 प्रवाशांची नोंद आहे. नाशिकरोड ते नाशिक हा प्रवासाचा टप्पा बससेवेच्या दृष्टीने सर्वाधिक फायद्याचा असल्याचे ट्रायल रनमधून समोर आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com