नाशिकच्या ट्रेकरचा माळशेज घाट परिसरात मृत्यू

नाशिकच्या ट्रेकरचा माळशेज घाट परिसरात मृत्यू

नाशिक | Nashik

येथील ट्रेकरचा माळशेज घाट परिसरात (Malshej Ghat Area) चोरदरा घाट चढत असताना ५० फूट खाली पडून मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, किरण काळे (Kiran Kale) (वय ५२) असे मृत्यू झालेल्या ट्रेकरचे नाव आहे. रविवार (दि.१९) रोजी नाशिक येथील 'जिप्सी ट्रेकर्स'च्या १५ ट्रेकरचा ग्रुप माळशेज परिसरात जुना माळशेज घाट व चोरदरा घाटात ट्रेकिंगसाठी (Trekking) आला होता.

नाशिकच्या ट्रेकरचा माळशेज घाट परिसरात मृत्यू
WPL 2023 : आज डबल हेडर सामना ; 'या' संघांमध्ये होणार लढत

त्यावेळी दुपारच्या सुमारास चोरदरा घाट (Chordara Ghat) चढत असताना शेवटच्या चढाईदरम्यान लागणाऱ्या कठीण टप्प्यावरून जातांना अचानक किरण काळे यांचा तोल गेला. त्यामुळे ते थेट ५० फुट खोल असलेल्या दरीत कोसळल्याने त्यात काळे यांचा जागीच मृत्यू झाला.

नाशिकच्या ट्रेकरचा माळशेज घाट परिसरात मृत्यू
सुषमा अंधारेंनी उडवली मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' विधानाची खिल्ली; म्हणाल्या...

दरम्यान, यानंतर घटनास्थळी तात्काळ स्थानिक पोलिसांसह (Police) गिर्यारोहक आणि रेस्क्यू टीमने तातडीने दाखल होत इतर अडकून पडलेल्या ट्रेकर्सची यशस्वी सुटका केली. त्यानंतर नाशिकच्या दयानंद कोळी, मुरबाड येथील सह्यगिरी ट्रेकर्सचे दीपक विशे व खोपोली येथील गणेश गिध यांनी इतरांच्या मदतीने खोल दरीतून किरण काळे यांचा मृतदेह बाहेर काढला. यानंतर रात्री उशिरा त्यांचे पार्थिव नाशिकमध्ये (Nashik) आणण्यात आले. काळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com