वृक्ष करुन देतील लेकीच्या जन्माची आठवण

सामाजिक वनीकरणकडून पेठ तालुक्यात आगळ्यावेगळ्या पद्धतीने वृक्षारोपण
वृक्ष करुन देतील लेकीच्या जन्माची आठवण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वृक्षांविषयी नागरिकांमध्ये आवड व्हावी तसेच जमिनीवरील वन आच्छादन वाढावे, याकरिता शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. यानुसारच सामाजिक वनीकरण (Social forestry) विभागाच्या पेठ (Peth) परिक्षेत्रातील घनशेत (Ghanshet), भायगाव (Bhaygaon) व कोपूर्ली बूद्रूक (Kopurli Budruk) या गावात कन्या वन समृद्धी योजनेंतर्गत (Kanya Van Samrudhi Yojana) करण्यात आले...

या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे मुली मोठ्या झाल्यावर या वृक्षांमुळे त्यांच्या आठवणी जोपासल्या जाणार आहेत. या तिन्ही गावात 2019-20 ते 2020-21 या वर्षांमध्ये ज्या बालिकांचा जन्म झाला आहे.

त्यांच्या पालकांना बालिकांच्या नावाने सामाजिक वनिकरणकडून प्रत्येकी दहाSamruddhi Yojana) जन्म झालेल्या बालिकांच्या नावाने पालकांना प्रत्येकी दहा रापे देउन वृक्षारोपण (Tree Plantation रोपे देण्यात आली.

सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी सी. डी. भारमल (C. D. Bharmal), पेठ्चे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार (Prashant Khairnar) यांच्या हस्ते पाच सागवान व पाच फळांची रोपे देण्यात आली. कन्या वन समृध्दी योजने व्यतिरिक्त गावातील ज्या ज्येष्ठ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशा व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ एक रोप नातेवाईकांना देण्यात आले.

सी. डी. भारमल यांनी म्हणाले की, गावात एखाद्याचा जन्मदिवस, लग्न असेल तर त्यांनी त्या दिवसाची आठवण म्हणून एक रोप लावावे. यातून गाव परिसरात वृक्ष अच्छादन वाढेल आणि ग्रामस्थांमध्ये वृक्षांविषयी आवड निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नागरिकांना खड्डा खोदून कशा पद्धतीने रोपे लागवड करावी, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. वनरक्षक डी. पी. जाधव, एम. एम. जाधव, बी. ए. बंगाळ तसेच संबंधित गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, कन्या वन समृद्धी योजनेचे लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com