सीआयआय यंग इंडियन्सतर्फे वृक्ष लागवड

सीआयआय यंग इंडियन्सतर्फे वृक्ष लागवड

सातपूर | प्रतिनिधी Satpur

नाशिक येथील जैवविविधता आणि हवामान पुनर्प्रस्थाीपत (Biodiversity and climate regeneration) करण्यासाठी सीआयआय यंग इंडियन्सच्या (CII - Young Indians) नाशिक शाखेच्या (Nashik Division) वतीने चांंदशी (Chandshi) येथे वृक्ष लागवडीचा उपक्रम (Tree Plantation Drive) हाती घेतला आहे.या उपक्रमात 200 हून अधिक रोपे (Plants) लावण्यात आली आहेत.

स्वच्छ आणि हरित नाशिकमध्ये (Clean and green Nashik) नैसर्गिक आधिवासाचे पुनरुत्पादन (Reproduction of natural habitat) करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ सीआयआय महाराष्ट्राचे अध्यक्ष सुधिर मुतालिक (CII- Maharashtra President Sudhir Mutalik) यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी सीआयआय यंग इंडियन्स नाशिक शाखेचे अध्यक्ष जनक सारडा (Janak Sarda, President, CII Young Indians Nashik Branch) व इतर सभासद उपस्थित होते.

सीआयआय वाय आय हे भारतीय युवकांना एकत्र येण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी, सहनिर्मितीसाठी आणि भारताच्या भविष्यावर प्रभाव टाकण्यासाठी एक चळवळ आहे. 2002 मध्ये स्थापन झालेल्या, वाय आयचे 55 शाखांमध्ये 3700 पेक्षा जास्त थेट सदस्य आहेत आणि महाविद्यालयांतील 29हजार 500 विद्यार्थी सदस्य आहेत.

वायआय नाशिकच्या वतीने मियावाकी वन वृक्षारोपण उपक्रम सुरू करून नाशिकमध्ये इतिहास घडवला जात आहे. हे केवळ वृक्षारोपण नाही, ते नाशिकला मूळ जंगल परत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. नाशिकचे लोक झपाट्याने वाढणारे हे जंगल पाहण्यासाठी नक्कीच उत्साहित असतील यामुळे शहराचे तापमान खाली आणण्यासही मदत होईल. सोबतच स्थानिक वन्यजीवांंना आधार देईल

-सुधिर मुतालिक अध्यक्ष सिआयआय महाराष्ट्र

नाशिकमध्ये वर्षभर सुखद हवामान असते. परंतु हवामान बदलाचा परिणाम जगभरात जाणवत आहे.हवामानातील हे बदल पुनर्प्रस्थापित करण्यासांठी प्रयत्न म्हणून यंग इंडियन्सने हा प्रकल्प हाती घेतला आहे.सातपूर येथील जंगल प्रकल्पातून प्रेरणा घेऊन चांदशी येथील हा प्रकल्प हाती घेतला आहे.यानिमित्ताने नाशकातील जैवविविधता पुन्हा बहरेल आणि नाशिकचे हवामान पूर्ववत करण्यास मदत होईल,असा विश्वास वाटतो.

-जनक सारडा, अध्यक्ष नाशिक चॅप्टर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com