नाशिक | प्रतिनिधी

वकीलवाडीतील सारडा संकुल परिसरात आंब्याचे अचानक आंब्याचे झाड कोसळल्याने दुचाकींचे नुकसान झाले. वनवे असलेल्या या रस्त्यावर अचानक झाड कोसळल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती...

तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत ६-७ दुचाकी झाडाखाली दबल्या गेल्या होत्या. महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला याठिकाणी पाचारण करण्यात आले असून झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याच काम सध्या सुरु आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.

(सर्व फोटो : निखील परदेशी, सतीश देवगिरे नाशिक)