नाशकात वाढला वाऱ्याचा वेग; झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान

नाशकात वाढला वाऱ्याचा वेग; झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकसह परिसरात वाऱ्याचा वेग कालपासून वाढलेला आहे. (Wind speed increased in Nashik) वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली. आजही तिबेटीयन मार्केट (Tibetan market area) परिसरातील एचडीएफसी हाऊस येथे अचानक एक झाड रस्त्यावर आडवे झाल्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले....

कालपासूनच दिवस-रात्र वाऱ्याचा वेग (Wind Speed Increased in Nashik) वाढलेला आहे. आज दुपारच्या आकडेवारीनुसार ४३ किलोमीटर प्रतीतास (43 KM per hour) या वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

तिबेटीयन मार्केटच्या नजीक असलेल्या एचडीएफसी हाऊसजवळ दुपारी अचानक एक झाड कोसळले. यावेळी रस्त्याच्या किनारी उभ्या असलेल्या वाहने या झाडाखाली दाबली गेली होती. तर बराच वेळ घटनास्थळी वाहतूक कोंडी झाली होती.

झाडाखाली उभ्या असलेल्या दुचाकीचेदेखील या घटनेत नुकसान झाले आहे. झाड पडल्यामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. नाशिक पोलीस, मनपाचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com