कॅन्टोन्मेंट रूग्णालयात उपचार सेवा पूर्ववत

कॅन्टोन्मेंट रूग्णालयात उपचार सेवा पूर्ववत

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

कोविड ( covid ) काळात केंद्र व राज्य सरकारचे आदेश तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल ( Cantonment Hospital )कोविडसाठी राखीव करण्यात आले होते.

परंतु सध्या कोविड रुग्णांची संख्या व इतर आजारांच्या उपचारासाठी जनतेची होणारी अडचण लक्षात घेऊन 1 सप्टेंबरपासून हॉस्पिटलमध्ये सर्व सेवा पूर्ववत केल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

देवळाली कॅम्प, भगूर व परिसरातील 28 गावांसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल गेल्या दीड ते दोन वर्षापासून कोविडसाठी राखीव करण्यात आले होते. परिणामी इतर आजारांच्या उपचारासाठी नागरिकांना इतरत्र धावपळ करावी लागत असे. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. राहुल गजभिये यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध शिष्टमंडळानी भेटी दरम्यान केलेल्या सूचना लक्षात घेऊन डॉ. गजभिये यांनी कॅन्टोन्मेंट रुग्णालयात जाऊन वस्तुस्थितीची माहिती घेतली असता कोविड रुग्णांची संख्या अतिशय कमी झाली आहे.

शिवाय ओपीडी बंद असल्याने व इतर आजारासाठी जनतेला होणारा त्रास कमी करणे गरजेचे असल्याने त्यांनी तातडीने राज्य शासनासह जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल पूर्ववत करण्याची मागणी केली असता ती मंजूर करण्यात आली. कालपासून (दि. 1) या हॉस्पिटलमध्ये ओपीडी सेवासह इतर सेवाही पूर्ववत करण्यात आली आहे.

कोविड काळात देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा प्रथम क्रमांक लागला असून इतर सेवांसाठीही या हॉस्पिटलने आपले उच्चतम प्रदर्शन वेळोवेळी केले आहे. डॉ. गजभिये यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तत्परता दाखवत हॉस्पिटलची सेवा पूर्ववत केल्याने जनतेने स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com