'इतक्या' खाजगी रुग्णालयात करोना रुग्णावर उपचार

पुन्हा २० रुग्णालयांची मागणी
'इतक्या' खाजगी रुग्णालयात करोना रुग्णावर उपचार

नाशिक । Nashik

नाशिक शहरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर करोना संसर्ग मोठ्या वेगात पसरल्यानंतर महापालिका प्रशासनाकडुन खाजगी रुग्णालयातील खाटा आरक्षित करीत काही रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचारांकरिता परवानगी दिली होती.

काही खाजगी संस्थांना देखील कोविड - 19 रुग्णांवर उपचारासाठी परवानगी दिली होती. अशाप्रकारे आत्तापर्यत 86 खाजगी रुग्णालयांना कोविड उपचारासाठी परवानगी दिल्यानंतर आता शहरातील पुन्हा 20 खाजगी रुग्णालयांनी कोविड उपचारासाठी परवानगी मागितली असल्याने पुढच्या काळात अजुन सुमारे 350 ते 400 खाटा उपलब्ध होणार आहे.

शहरात जुन महिन्यापासुन करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत गेल्यानंतर प्रति दिन शंभर नवीन रुग्णांपासुन करोना रुग्ण वाढत जाऊन ते 250, 400 - 500, 700 ते 800 आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रतिदिन 1 हजार अशाप्रकारे रुग्ण वाढत गेले आहे. रुग्णांचा दुपटीचा वेग 24 - 25 दिवसावर गेल्यानंतर महापालिका प्रशासनाकडुन शहरातील रुग्णालयातील खाटा ताब्यात घेत याठिकाणी करोना रुग्णावर उपचार सुरू करण्यात आले.

गेल्या सप्टेंबर महिन्यात तर उपचार घेणार्‍या रुग्णांचा आकडा 5 ते 6 हजारापर्यत जाऊन पोहचला होता. यामुळे महापालिकेकडुन खाटा वाढविण्यात आल्यानंतर आयसीयु, ऑक्सीजन व व्हेंटीलेटर खाटा वाढविण्यात आल्या आहे. एकुणच शहरात आत्तापर्यत 86 खाजगी रुग्णालयांना महापालिकेकडुन कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. आता आणखी 20 खाजगी रुग्णालयांनी कोविड उपचारासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे.

शहरातील काही नॉन कोविड रुग्णालयातील रुग्ण कोविड होत असल्याने आता अशा रुग्णांवर याचठिकाणी उपचार होण्यासाठी काही खाजगी रुग्णालयाने कोविड उपचारासाठ परवानगी मागितली आहे. नॉन कोविड रुग्णालयातील काही भागात आता कोविड रुग्णांवर उपचार करण्याचे नियोजन आता खाजगी रुग्णालय व्यवस्थापनाकडुन सुरू झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com