मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ

मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नोव्हेंबर 2020 मध्ये मध्य रेल्वेने 5.65 दशलक्ष टन मालवाहतूक केली. जी नोव्हेंबर 2019 मध्ये केलेल्या 5.58 दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत 1.3 टक्के वाढ दिसून आली.

नागपूर विभागातून डोलोमाईट, कॉटन हस्क, कॉटन बियाणे, कडबा, तांदूळ आणि फ्लाय अ‍ॅश, भुसावळ विभागातील हस्क, पुणे विभागातील अ‍ॅग्रो आधारित पोटाश अशा नवीन मालाची वाहतूक रेल्वेकडे वळवण्यासाठी विभागातील व्यवसाय विकास घटकांनी आक्रमकपणे मार्केटिंग केले आहे.

यावर्षी मध्य रेल्वेकडून ऑटोमोबाईलच्या रेक्सची लोडिंग 155 पर्यंत पोहोचली आहे. विविध टर्मिनल्समधून बांगलादेशात वाहनांची निर्यात होणारी वाहतूक रेल्वेकडे वळवण्यात यश आले असून ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये तीसहून अधिक रेक्सची लोडिंग केली गेली. एप्रिल ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत कांद्याच्या 182 रेक्स लोड केल्या गेल्या जी मागील वर्षभरात केलेल्या लोडिंगपेक्षा 25 रेक्सनी जास्त आहे.

या 182 रेक्सपैकी 79 रेक्स बांगलादेशात पाठवण्यात आले. नोव्हेंबर 2020 मध्ये मुंबई विभागाने 1,252 वॅगन्सची प्रतिदिन अशी सर्वाधिक लोडिंगची नोंद केली आहे. भुसावळ विभागाने ऑक्टोबर 2020 मध्ये एनएमजीची सर्वाधिक 21 गाड्यांची नोंद केली आहे. नोव्हेंबरमध्येसुद्धा 21 रेक्स अशीच ठेवली. किसान रेल हे अजूनही शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

किसान रेल्वेच्या आतापर्यंत 41 ट्रिपमध्ये 13513 टन नाशवंत व इतर वस्तूंची वाहतूक झाली आहे. जेऊर स्टेशनवरून प्रथमच 23 टन केळी भरली गेली. कोविड कालावधीत आतापर्यंत 649 पार्सल गाड्या चालवल्या गेल्या. भिवंडी, पंढरपूर, सांगोला, बेलवंडी, कोपरगाव, मोडलिंब, जेऊर, लासलगाव, वरूड ऑरेंज सिटी, काटोल, पांढुर्णा, नरखेड आणि कळमेश्वर स्थानकही पार्सल वाहतुकीला आकर्षित करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com