पुल वाहून गेल्याने दळणवळण ठप्प

रस्त्यासाठी ग्रामस्थांचे नदीपात्रात उतरून आंदोलन
पुल वाहून गेल्याने दळणवळण ठप्प

जातेगाव । वार्ताहर Jategaon-Nandgaon

नांदगाव तालुक्यातील (Nandgaon) जातेगावपासून बोलठाणकडे जाणार्‍या खरोळी नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वेगवान प्रवाहामुळे वाहून गेला आहे. तसेच पाच किलोमीटर अंतराचा डांबरी रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे (pothholls) पडल्याने दळणवळण जवळपास ठप्प झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरीकांनी खरोळी नदीपात्रात उतरून रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन (Movement) छेडले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे (Department of Public Works) कनिष्ठ अभियंता राहुल चोळके (Junior Engineer Rahul Cholake) यांनी दोन दिवसात तात्पुरत्या रस्त्याची सिमेंट पाईप टाकून दुरूस्ती केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर तब्बल पाच तासानंतर हे जलआंदोलन (Water movement) कार्यकर्त्यांनी मागे घेतले. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या कामासाठी तसेच खरोळी नदीवरील उंच पुलासाठी 2 कोटी 17 लाख रुपये मंजूर केले आहे. परंतु करोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे मध्यंतरी डांबर न मिळाल्याने रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत राहिले.

यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पर्जन्यवृष्टी (Heavy Rain) झाल्याने नदीला आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे नवीन पुलाचे काम चालू करता आले नाही. त्यामुळे रहदारी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात सिमेंटचे पाईप टाकून बाजूला तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरील खडी आणि मुरमाचा भराव मागील आठवड्यात वाहून गेला आहे.

पाण्याचा प्रवाह सुरळीत चालू ठेवण्यासाठी टाकण्यात आलेल्या सिमेंट पाईपांपैकी एक पाईप फुटल्याने जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे संपुर्ण दळणवळण ठप्प झाले असतांना देखील रस्त्याची व्यवस्था केली जात नसल्याने प्रहार शेतकरी संघटनेचे (Prahar Shetkari Sanghatna) अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली चंद्रभान झोडगे, शाखाध्यक्ष जनार्दन भागवत,

वैभव शिंदे, निवृत्ती सोनवणे, रविकांत भागवत, गणेश चव्हाण, कृष्णा पवार आणि राहुल पवार आदी पदाधिकारी व नागरीकांनी नदीच्या तीन फूट प्रवाहात दुपारी 12 वाजेपासून आंदोलन सुरू केले होते. कनिष्ठ अभियंता चोळके यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com