पेठ
पेठ
नाशिक

पेठ : पुल नसल्याने पाण्यातून वाहनांची वाहतूक

मुरुमटी येथील नागरिकांचे हाल

Gokul Pawar

Gokul Pawar

मुरुमटी । MuruMati

पेठ तालुक्यातील मुरुमटी गावाला जोडणार्‍या रस्त्यावर पुल नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे.

मुरुमटी हे गाव 25 ते 35 घराचे वस्तीच एक खेडे असून लोकसंख्या 250 ते 300 आहे. या गावाने देश स्वतंत्र झाल्यापासून विकास बघितला नाही. असे परिसरात अनेक खेडी अजून विकासापासून वंचित आहे ना गावाला धड रस्ता ना फरशी, पूल, अशी परिस्थिती आहे. या गावात रस्ता नसल्याने गावाला शिक्षक नाही.नदी आडवी असल्यामुळे पावसाळ्यात शिक्षण, बाजार, दवाखान्यात जाण्यासाठी हरसूल किंवा कोहोर या बाजारपेठेतमद्ये जाणेसाठी अडचण उद्धभवते.

या गावात जाण्यासाठी नदी ओलांडुन जावे लागते. परंतु पूल नसल्याने कुणालाही पावसाळ्यात रस्ता ओलाडता येत नाही. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते. दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता वाहतुकीची साधन उपलब्ध नाही. रस्ता व फरशी नसल्याने गरोदर महिलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुल नसल्यामुळे नदी उतरुन जावे लागते. पावसाळ्यात कुणाचे निधन झाले तर स्मशानभुमीकडे नेताना व अग्नीडाग देताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते.

पावसाळ्यात बैल, गाय, शेळ्या फरशी नसल्यामुळे नदीने वाहुन नेले आहे. शासनाने त्वरीत मुरुमटी रस्त्यावर पुल बांधुन गावाचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com