परिवहन चौकशी अहवाल सादर

निर्णयाकडे राज्याचे लक्ष
परिवहन चौकशी अहवाल सादर
USER

नाशिक | प्रतिनिधी

प्रादेशिक परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी अखेर पूर्ण झाली आहे. यामध्ये 35 अधिकारी व खासगी व्यक्तींचे जाब जबाब नोंदवण्यात आले असून चौकशी अधिकारी उपायुक्त संजय बारकुंड यांनी तपासाचा अहवाल शनिवारी पोलिस आयुक्तांना सादर केला आहे. आता पोलीस आयुक्त यावर काय निर्णय घेतात याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

परिवहन विभागात मोटार वाहन निरिक्षक म्हणुन कार्यरत असणारे गजेंद्र तानाजी पाटील यांनी परिवहन विभगातील कथीत भ्रष्टाचाराबाबत तक्रार दाखल केली आहे.तर पोलीस दखल घेत नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यात परिवहन विभागातील भ्रष्टाचार तसेच पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नमुद केले होते. यात परिवहन विभागाचे मंत्री अनिल परब , सचिव, आयुक्त, अपर सचिव, उपसचिव, विभागीय परिवहन अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांवर संघटीत भ्रष्टाचार, मनीलॅड्रींगचे आरोप करण्यात आले आहेत.

आरोप करण्यात आलेल्यांमध्ये मंत्री तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांची नावे असल्याने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. 27 मे पासून सुरू झालेल्या चौकशीस दोन वेळा पाच दिवसांची मुदत देण्यात आली.

दरम्यान समोर येणार्‍या पुराव्यांनुसार पोलिस आयुक्त पुढील निर्णय घेणार आहेत. याप्रकरणी लवकर निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु पोलीस काय निर्णय घेणार याबाबत सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे. याबरोबरच पाटील यांच्या याचिकेच्या सुनावणीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com