इंधन दरवाढीमुळे ट्रान्स्पोर्ट व्यवसाय अडचणीत

दोन हजार वाहनांवर वीस हजार कुटूंब अवलंबून
इंधन दरवाढीमुळे ट्रान्स्पोर्ट व्यवसाय अडचणीत

सातपूर | Satpur

लॉकडाउनमुळे अनेकांना व्यवसायही मिळत नसल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. गेल्या वर्षभरात डिझेलचे दर लिटरमागे तब्बल 26 रुपयांनी वाढल्याने मालवाहतूकदारांना नुकसान सहन करावे लागत आहे. मालवाहतुकीसाठी वर्षभरासाठी विविध उद्योगांशी मालवाहतूकीचे दर निश्चित करुन कंत्राट ठरविलेले असतात.ओजच्या वाढत्या दरामुळे तोटा सहन करावा लागत आहे.

त्यातच जिल्ह्यात मालवाहतूक व्यवसायाचा विस्तार मोठा आहे. दोन हजारापेक्षा जास्त ट्रकांच्या माध्यमातून दररोज विविध राज्यांतून, शहरांतून हजारो वाहतूक व्यवसायीक कार्यरत आहेत. राज्यासह परराज्यातून माल मिळविण्यासाठीही मोठी स्पर्धा झालेली आहे.त्यातच गेल्या वर्षभरात विक्रमी इंधन दरवाढ झाली.

डिझेलच्या किमतीत वर्षभरात लिटरमागे तब्बल 26 रुपयांची वाढ झाली.त्यामुळे वाहतूकदारांचे कंबरडेच मोडले आहे. कंपन्यांशी करार असल्यामुळे त्यांची मालवाहतूक करणे बंधनकारक असताना, दुसरीकडे डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेल्यामुळे फेर्‍या परवडत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, वाहनांचा मेंटेनन्स निघण्यासाठी तरी मिळेल त्या दरात फेरी मारण्यासाठी अनेक मालवाहतूकदारपूढे येऊ लागलेले आहेत.

वीस हजार रोजगार अडचणीत

जिल्ह्यात दोन हजार मालवाहतूक व्यवसायावर सुमारे 20 हजार जणांचे रोजगार अवलंबून आहेत. ट्रकमालक, चालक, क्लीनर तसेच वाहनांमध्ये लोडिंग-अनलोडिंग करणारे हमाल, गॅरेजचालक अशा आणखी कितीतरी लोक या साखळीत विसंबून आहेत.

सरकारने पूर्वी विशिष्ट महिन्यांत इंधन दरवाढ करीत होते. आता रोजची दरवाढ जाचक आहे.वशर्षातून एकदाच इंधन दरवाढ करावी.त्या अनूषंगानेउद्योगांशी करार करताना दर निश्चित करणे सोपे होऊ शकेल.

- राजेंद्र फड, (अध्यक्ष, नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशन)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com