नाशिक । Nashik

ई- वे बिल प्रणालीतील 24 तासात 100 किलोमीटर अंतराची तरतूद कायम ठेवण्यात यावी अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी. एम. सैनी यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन व जीएसटी कौन्सिल ऑफ इंडियाकडे पत्राद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मधील बिलातील तरतुदीत करण्यात आलेला महत्त्वाचा बदल 1 जानेवारी 2021 पासून लागू झाला. त्यापूर्वी ई वे बिल 100 किलोमीटर प्रतिदिन याप्रमाणे तयार केले जात होते. त्यानुसार प्रत्येक 100 किलोमिटरला एक दिवस वाढत जात असे, मात्र नव्या नियमात बदलानुसार 100 ऐवजी 200 किलोमीटर प्रतिदिन असा कालावधी देण्यात आला आहे.

एक हजार किलोमीटर करिता या नियमानुसार पाच दिवस मिळत असून त्याचा कालावधी संपला तर ऑनलाइन त्याचा कालावधी वाढवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या तरतुदीमुळे गैरप्रकारांना आळा बसणार असता तरी यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मात्र अडचणीत आला आहे. जीएसटी परिषदेने केले असून एक जानेवारी 2021 पासून 100 ऐवजी 200 किलोमीटर प्रतिदिन यानुसार ई वे बिल तयार करावे लागत आहे.

मात्र यातून अडचणी निर्माण होत असून काही घटनांमध्ये ड्रायव्हरकडून वाहन पोहोचण्यास उशीर झाला तरी दंड आकारण्यात येत आहे. याचा फटका ट्रान्सपोर्ट व्यवसायिक व उद्योजकांना आहे.

त्यामुळे ई- वे बिल प्रणालीतील 24 तासात 100 किलोमीटर अंतराची तरतूद कायम ठेवण्यात यावी अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व नाशिक गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन पी.एम.सैनी यांनी केली आहे.