
नाशिकरोड । प्रतिनिधी Nasikroad
गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून संपूर्ण राज्यात सध्या अशी आहे ड्रग्ज प्रकरण गाजत आहे मात्र ज्या शिंदे गावात ड्रग्जचे दोन कारखाने सापडले ते नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने व नाशिक रोड पोलिसांना याबाबत माहिती का नाही या कारणावरून चौकशी करण्यासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांची अखेर नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी शिंदे गाव येथे छापा टाकून ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केला व त्या ठिकाणाहून सुमारे 300 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले नाशिक रोड पोलिसांना अंधारात ठेवून मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. परिणामी गेल्या शनिवारी त्याच परिसरात नाशिक रोड पोलिसांनी छापा टाकून ड्रगसाठी जो कच्चामाल पुरविण्यात येतो त्या कारखान्यावर धाड टाकून सुमारे 6 कोटी रुपयांचा ड्रग जप्त केला.
सदरच्या कारखान्याची माहिती जागा मालकाने पोलिसांना दिली होती दरम्यान हे दोन्ही कारखाने नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीत असल्याने नाशिक रोड पोलीस स्टेशन सध्या वादाच्या भोवऱ्यात त सापडले आहे आत्तापर्यंत याबाबत काही पोलिसांची चौकशी सुद्धा झाली आहे आता आणखी चौकशी करण्यासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.