मनपातील लिपिकांच्या बदल्या

मनपातील लिपिकांच्या बदल्या

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आठ वर्षाच्या खंडानंतर महापालिकेत NMC पदोन्नतीची प्रक्रीया Promotion राबविण्यात आली. त्यामुळे पदोन्नती मिळालेल्या 191 लिपीकांच्या पदस्थापनेबरोबरच बदल्याही Transfer करण्यात आल्या आहेत.

अनेक ठिकाणी ठाण मांडणार्‍यांना देखील या निमित्ताने दणका मिळाला आहे. आता अ वर्गातील स्थापत्य अभियंत्यांच्या पदोन्नत्या हेाणार असून त्यातील फेरबदलांकडे

महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून आहे. महापालिकेत 2013 नंतर पदोन्नतीची प्रक्रीया रखडली होती. दोन वर्षापांसून लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी संघटना आक्रमक झाल्यानंतर प्रशासनाने देखील हा विषय हाती घेतला. आणि अखेरीस दिवाळीनंतर प्रशासाने सुमारे 436 कर्मचार्‍यांना पदोन्नती दिल्या आणि 37 अ आणि ब वर्गातील अधिकार्‍यांच्या पदोन्नतीचा विषय नियुक्ती प्राधीकरण असलेल्या महासभेत ठेवला हेाता.

महासभेने तो मंजुर केल्यानंतर पदस्थापनांना सुरूवात केली आहे. यातील यांत्रिकी विभागोच्या पदोन्नतीची संख्या कमी असल्याने त्यांच्या अगोदरच पदस्थापना झाल्या आहेत. ततर 112 वरीष्ठ आणि 79 कनिष्ट लिपीकांना पदस्थापनेच्या निमित्ताने बदल्या करण्यात आल्या आहेत. आता स्थापत्य अभियंत्यांच्या पदस्थापनेच्या निमित्ताने बदल्या होणार असून त्यातील फेरबदलांकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com