माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रावखंडे यांची अखेर बदली

सक्तीच्या रजेनंतर एड्स नियंत्रण सोसायटीत नियुक्ती
माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रावखंडे यांची अखेर बदली
USER

नाशिक । प्रतिनिधी

करोना नियंत्रणासाठी तयारी तसेच उपाययोजना करण्यात अपयश आल्यानंतर शासनाने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेल्या माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. मुंबईतील महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या सहायक संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत.

करोना संसर्गाची पहिली लाट कमी झाल्याच्या काळात डॉ. रावखंडे ह्या नाशिकमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून रूजु झाल्या होत्या. परंंतू या काळात फायर ऑडीट व जुने अग्निप्रतिरोधक सिलेंडर हा मुद्दा गाजला होता. तसेच करोनाच्या दुसर्‍या लाटेच्या प्रारंभी तत्परतेने आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात त्यांना अपयश आले होते. तसेच गरज असतानाही जिल्हा रूग्णालयात अनेक व्हेंटीलेटर पडून असल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या समोर आल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त करत आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठवून तडकाफडकी डॉ. रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.

त्या आजारपणाच्या रजेवर गेल्याने डॉ. अशोक थोरात यांची त्यांच्या जागी नियुक्ती झाली. त्यामुळे रावखंडे या पदस्थापनेशिवाय होत्या. त्यांना मुंबईतील वडाळा येथील महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या सहायक संचालक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव वि. पु घोडके यांनी रावखंडे यांच्या नियुक्तीचे आदेश काढले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com