
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शासनाने (Government) राज्यातील बारा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज सायंकाळच्या सुमारास काढले आहेत.
गृह विभागाने (Home Department) आज जारी केलेल्या आदेशानुसार नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांचीही बदली करण्यात आली आहे.
मीरा भाईंदर वसई विरार (Meera Bhayander Vasai Virar) येथे उपायुक्त म्हणून पौर्णिमा (Pournima Chaugule) चौगुले यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नाशिकला नवीन अधिकारी अद्याप देण्यात आलेला नाही. चौगुले यांनी गुन्हे शाखा तसेच मुख्यालयात उपायुक्त म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे.