इगतपुरी रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्या ठप्प

मुसळधार पावसामुळे प्रवाशांचा खोळंबा
इगतपुरी रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्या ठप्प

इगतपुरी | Igatpuri

मुंबईत (Mumbai ) सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) मध्य रेल्वेच्या (Central Railway) वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.

मुंबईतील अतिवृष्टीमुळे मनमाड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस (Manmad Mumbai Rajyarani Express), पंचवटी एक्सप्रेस (Panchavti Express), दादर-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस, दादर-जालना जनशताब्दी एक्सप्रेस आदी गाड्या रद्द केल्या आहेत. तर, इगतपूरी रेल्वेस्थानकांवर मुंबईकडे जाणार्‍या गाड्या थांबविल्याने रेल्वे प्रवाशी (Railway Tourist) या स्टेशनवर अडकून पडले होते.

मुंबईकडून येणार्‍या आणि मुंबईकडे जाणार्‍या रेल्वेगाड्या अनिश्चित वेळेवर धावत असून काही गाड्या विविध रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) सांगण्यात आले आहे.

इगतपुरी रेल्वे स्थानकात गाड्या थांबविल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. अनेक प्रवाशांनी स्थानकाबाहेर येऊन खाजगी वाहनांनी मुंबईकडे जाणे पसंत केले. इगतपुरी शहर परिसरातही मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे.

त्यामुळे रेल्वे सुरळीत होण्याची शक्यता प्रवाशांंना वाटत नव्हती. त्यामुळे काही प्रवाशांनी अर्धवट प्रवास सोडून देणे पसंंत केल्याचे चित्र होते. रात्री उशिरा पर्यंत पावसाचा जोर वाढतच होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com