आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
आयटीआय

आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई । Mumbai

राज्यातील (Maharashtra State) दहा जिल्ह्यांमधील १२६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) (Government Industrial Training Institutions) शिकणाऱ्या साधारणतः १० हजार प्रशिक्षणार्थ्यांना 'ऑन जॉब ट्रेनिंग' (On Job Tranning) उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक (Skill Development Minister Nawab Malik) यांनी शुक्रवारी दिली.

यासाठी जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग (German Dual System of Training) या मॉडेल अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम (Tranning programme) राबविण्यात येणार असून याकरीता आज व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय, सिमेन्स लिमिटेड आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्हज ट्रस्ट (Siemens Limited and Tata Community Initiatives Trust) यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि त्याचबरोबर रोजगार उपलब्ध होईल, असे मलिक यांनी सांगितले.

राज्यातील नाशिक (Nashik), औरंगाबाद(Aurangabad), कोल्हापूर (Kolhapur), मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur), पालघर, पुणे, रायगड आणि ठाणे या १० जिल्ह्यातील १२६ शासकीय आयटीआयमध्ये इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राईंडर, टूल आणि डाय मेकर, मोटार मेकॅनिक व्हेईकल, रेफ्रीजरेशन आणि एअर कंडीशनिंग तसेच वेल्डर या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या आयटीआयना नजिकच्या उद्योगांशी जोडून त्याद्वारे त्या उद्योगांमध्ये उमेदवारांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे मलिक यांनी सांगितले.

आयटीआयमधील प्रथम वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक महिन्याचे ऑन जॉब ट्रेनिंग, द्वितीय वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्याचे ऑन जॉब ट्रेनिंग तर आयटीआयचा अंतिम निकाल घोषीत झाल्यानंतर एक वर्षासाठी ॲप्रेंटीशीपची संधी उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल. हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही सुरु करण्यासाठी सिमेन्स लिमिटेड आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हीज ट्र्स्ट यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मंत्री नवाब मलिक यांनी केले.

आयटीआयमधील पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाचा विकास करण्यासाठी विविध उद्योग स्वत:हून पुढाकार घेत आहेत. यासाठी आतापर्यंत ५० हून अधिक नामांकीत औद्योगिक आस्थापनांबरोबर सामंजस्य करार करण्यात आल्याची माहितीही नवाब मलिक यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com