जिल्हा शासकीय रुग्णालयात परिचारिकेची आत्महत्या

जिल्हा शासकीय रुग्णालयात परिचारिकेची आत्महत्या

नाशिक । Nashik

शहरातील त्र्यंबकरोड लगत असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (District Government Hospital) आवारात एका प्रशिक्षणार्थी परिचारिकेने (Trainee Nurse) आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की , माधुरी काशिनाथ टोपले (Madhuri Kashinath tople) वय (१९) रा. वांगण सुळे ता. सुरगाणा (Surgana) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या परिचारिकेचे (Nurse) नाव असून तिने रात्रीच्या सुमारास आपल्या रुमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यानंतर आज सकाळी ही घटना उघडकीस आली. ही परिचारिका पहिल्या वर्षाला शिकत होती. तसेच तिने आत्महत्या का केली याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान पोलिसांनी (police) घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी (autopsy) पाठविण्यात आला आहे. तसेच अधिक तपास सरकारवाडा पोलिस (Sarkarwada Police) करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com