नाशिक । Nashik

नाशिकहून हाकेच्या अंतरावर मात्र दुर्गप्रेमींकडून दुर्लक्षीलेल्या गेलेल्या घारगड किल्यावर गरुडझेपच्या दुर्गवीरांनी चढाई केली. वाहतूक सुरक्षेबाबात प्रबोधन, नदी स्वच्छता, बेटी पढाव बेटी बचाव आंदोलन आदी अनेक उपक्रम गरुडझेप प्रतिष्ठानाकडून राबवण्यात येत आहेत.

अस्थिदिव्यांग जागर्तिक विक्रमवीर अंजली प्रधान, गरुडझेप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डाँ. संदिप भानोसे यांच्यासह गरुडझेपच्या ८ दूर्गप्रेमींनी गडावर यशस्वी चढाई केली. अंजली प्रधान यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच असणाऱ्या कळसूबाई शिखरावर तीन महिन्यात तब्बल 11 वेळा चढाई करुन विश्वविक्रम नोंदवला आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डाँ. संदिप भानोसे यांच्या नावावर वाहतूक सुरक्षा अभियानाचे सहा विश्वविक्रम नोंदवण्यात आले आहे.

प्रारंभी गरुडझेपच्या प्रतिष्ठानचे विश्वविक्रमी १०७८ सातत्यपूर्ण वाहतूक सुरक्षा अभियान गडाच्या पायथ्यासी राबवण्यात आले. सुमारे पाउण तासात दुर्गप्रेमींनी गडाचा माथा गाठला. माथ्यावर पोहोचताच गरुडझेपच्या दुर्गप्रेमींकडून गडाची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर भोजन करुन दुर्गप्रेमींनी माघारी प्रस्थान केले.

इतिहासात या किल्याची फारशी माहिती उपलब्ध नाही. पेशवाईचा पाडाव होवून त्र्यंबकराजचा किल्ला ब्रिटीश सत्तेकडे गेल्यावर लगेचच हा डोंगरी किल्ला ब्रिटीश सत्तेकडे गेल्याची नोंद आढळते. या किल्याची उभारणी अठराव्या शतकात झाल्याचे काही इतिहास तज्ज्ञांचे मत आहे.

या दुर्गभ्रमंती मध्ये श्रीधर ठाकूर , अमेय ठाकूर, शुभम ठाकूर, यश साबळे , अजिंक्य तरटे, प्रगती प्रधान , डाँ. संदिप भानोसे, अंजली प्रधान व संकेत भानोसे यांचा समावेश होता.