वाहतूक पोलिसास शिवीगाळ करणाऱ्यास कारावास; काय आहे प्रकरण?

वाहतूक पोलिसास शिवीगाळ करणाऱ्यास कारावास; काय आहे प्रकरण?
वाहतूक शाखा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

वाहतूक पोलिसाला (Traffic Police) शिवीगाळ करत धक्काबुक्की करणाऱ्या संशयिताला आरोपी ठरवत न्यायालयाने त्याला सहा महिने कारवास व तिन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली....

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाहतूक शाखा युनिट क्रमांक ३ च्या बाजूला राजेंद्र बळीराम सोनवणे (५४,रा. रामचंद्र रो हाउस नंबर ३८,अयोध्या नगरी नंबर १ अमृतधाम,पंचवटी ) व सुनील धनु जाधव (३८,रा. समर्थनगर,नाशिक ) यांनी त्यांची चारचाकी ( एम एच १५,डी सी ५१८३ ) ने अपघात केला.

यावेळी पोलीस नाईक सचिन गोपाळ जाधव यांनी चारचाकी पोलीस चौकीला घेण्यास सांगितले. यावेळी त्यांनी त्यांची चारचाकी अंबडच्या दिशेने भरधाव वेगाने नेली व जाधव यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली होती.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे हे करत असतांना त्यांनी सबळ पुरावे गोळा करून संशयिताविरोधात जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले.

जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ८ न्यायमूर्ती एम.ए.शिंदे यांनी परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून राजेंद्र बळीराम सोनावणे (५४)यांना दोषी ठरवत सहा महिने साधा करावास व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिने साधा कारावास व मवोका कलम अंतर्गत २ महिने साधा कारावास व १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

Related Stories

No stories found.