महाविद्यालयात विनाहेल्मेट प्रवेश; नाशिकच्या प्राचार्यांवर कारवाई

महाविद्यालयात विनाहेल्मेट प्रवेश; नाशिकच्या प्राचार्यांवर कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

हेल्मेट न वापरणाऱ्यांवर (Without helmet) नाशिकमध्ये कारवाई सुरु आहे. आता कारवाई अधिक व्यापक करत कर्मचारी, विद्यार्थी विनाहेल्मेट आल्यास अस्थापना प्रमुखांवर कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी नाशिकमधील प्राचार्य व मालमत्ता अधिकाऱ्यांवर यासंदर्भात कारवाई झाली.

विनाहेल्मेट (Without helmet) प्रवेश दिल्याने शहरातील आडगाव नाका (Adgaon Naka) परिसरातील दंत महाविद्यालय (Dental College) येथील मालमत्ता अधिकारी आणि कॉलेजरोड (College Road) येथील एचपीटी महाविद्यालयाच्या (HPT College) प्राचार्यांवर कारवाई करण्यात आली आहे...

वाहतूक पोलिसांनी (Traffic police) आस्थापनांमधील हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीसाठी आता भरारी पथके नेमली आहेत. त्यांच्या पाहणीत महाविद्यालयात विनाहेल्मेट प्रवेश करतांना दिसले. आयटीआय व मॉलमध्ये विनाहेल्मेट वाहनचालक जाताना दिसले. दोघांना न्यायालयात (Court) हजर केले जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com